आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : उत्तर प्रदेशमधील लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडून ठार मारल्याच्या घटनेमुळे देशभरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. महाविकास आघाडी सरकारनेही या घटनेचा निषेध म्हणून 11 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. यावरून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी या बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे.
शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या आणि बळीराजाला भेटायला जाणाऱ्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींना रोखणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी बंदमध्ये सहभागी व्हा, असं अशोक चव्हाण म्हणाले. ते माध्यमांशी बोलत होते.
मागील अनेक महिन्यांपासून देशाच्या कानाकोपऱ्यात शेतकरी आंदोलने होत आहे. पण केंद्र सरकार शेतकऱ्यांची बाजू समजून घ्यायला तयार नाही. केंद्र सरकारने लोकाभिमुख निर्णय घेण्याची गरज आहे. परंतु, त्याऐवजी एका केंद्रीय मंत्र्याच्या मुलाकडून शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना भरधाव वाहनाखाली चिरडले जाते. या घटनेतील पीडित कुटुंबांना भेटण्यासाठी लखीमपूर खेरीला जाणारे खासदार राहुल गांधी, प्रियंका गांधी सारख्या विरोधी पक्षातील नेत्यांना बळाचा वापर करून रोखले जाते, त्यांना अटक केली जाते. हा संपूर्ण प्रकार शेतकऱ्यांचा आणि विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. , ही दडपशाही लोक सहन करणार नाहीत असं अशोक चव्हाण म्हणाले.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ महाविकास आघाडीने 11 ऑक्टोबर रोजी ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला आहे. नागरिकांनी सुद्धा शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून या आंदोलनाला सहकार्य करावे, असं आवाहन अशोक चव्हाण यांनी केलं.
महत्वाच्या घडामोडी –
भाजपने माझी किंमत 100 कोटी ठरवली याचा मला आनंद- नवाब मलिक
पुण्यात मनसे करणार आंदोलन; ‘या’ कारणासाठी राज ठाकरे मैदानात
बुधवारी आणखी एक पोलखोल करणार; किरीट सोमय्यांचा पवारांना इशारा
काँग्रेसचा ‘हा’ बडा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर; चर्चांना उधाण