किरीट सोमय्या टाकणार बॉम्ब; राष्ट्रवादीचा मंत्री आणि शिवसेनेचा नेता सोमय्यांच्या रडारवर, ते दोन नेते कोण?

0
294

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. शिवसेनेचा एक नेता आणि राष्ट्रवादीचा एक मंत्री आपल्या रडारवर असल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितलं आहे. ते टीव्ही9 मराठीशी बोलत होते.

माझ्याकडे दोन गठ्ठे आहेत. पहिल्या गठ्ठ्यात 24 हजार पाने आहेत. त्यात ठाकरे सरकारच्या एका नेत्याचा घोटाळा आहे. दुसरा जो गठ्ठा आहे त्यात चार हजार पानं आहेत. तो शरद पवार यांच्या एका मंत्र्याच्या घोटाळ्याचा आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस दिल्लीत चर्चा करणार आहेत. त्यांनी मला सूट दिलेली आहे. सोमवारी हे नाव उघड करणार आहे. तुम्ही चांगले काम करता. तुमच्या सुरक्षेची जबाबदारी आमची आहे, असं फडणवीसांनी मला सांगितलं आहे. त्यामुळे मला सुरक्षा मिळालेली आहे आणि मला सर्व अधिकार आहेत, असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

दरम्यान, येत्या सोमवारी या दोन्ही नेत्यांचे भ्रष्टाचार उघड करणार असल्याचं सोमय्या यांनी. मात्र, त्यांनी या दोन्ही नेत्यांची नावं गुलदस्त्यात ठेवली आहेत. त्यामुळे हे दोन नेते कोण? यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

“साकीनाका निर्भया बलात्कार कांड; मुख्यमंत्र्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना केल्या ‘या’ महत्त्वाच्या सूचना”

साकीनाका बलात्कार प्रकरण; शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या मुख्यमंत्र्यांकडे ‘या’ चार मागण्या

साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडित महिलेच्या दोन्ही मुलींची जबाबदारी सरकार घेणार; एकनाथ शिंदेंची माहिती

साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेचा मृत्यू; प्रतिक्रिया देताना चित्रा वाघ यांना अश्रू अनावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here