उद्धव ठाकरेंवर टीका करताना, आमदार रवी राणांची जीभ घसरली, म्हणाले…

0
332

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अमरावती : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना आमदार रवी राणा यांची जीभ घसरली.

उद्धव ठाकरेंनी चुल्लूभर पाण्यात डुबून मरायला पाहिजे, असा हल्लाबोल रवी राणा यांनी यावेळी केला. रवी राणांच्या या वादग्रस्त विधानामुळे राज्यातील राजकारणात नवा वाद उकळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हे ही वाचा : कोणत्याही चित्रपटात जर पाकिस्तानी कलाकार दिसल्यास…; मनसेचा बाॅलिवूडला धमकीवजा इशारा

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना इंग्रजांनी काळ्या पाण्याची शिक्षा दिली. देशावर प्रेम करणारे, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात स्वत:ला समर्पित करणारे वीर सावरकर यांच्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांच्या वक्तव्याचं उद्धव ठाकरे यांनी समर्थन केलं, असा दावा रवी राणा यांनी यावेळी केला. उद्धव ठाकरे देशविरोधी वक्तव्य करणारे राहुल गांधी यांना समर्थन करतात. त्यामुळे राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राणा यांनी यावेळी केली. तसेच उद्धव ठाकरे यांनी खरंतर चुल्लूभर पाणीमध्ये डुबून मरायला पाहिजे, अशी टीका राणांनी यावेळी केली.

महत्त्वाच्या  घडामोडी –

कोणत्याही चित्रपटात जर पाकिस्तानी कलाकार दिसल्यास…; मनसेचा बाॅलिवूडला धमकीवजा इशारा

बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती बरखास्त होणार?; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

“राज्यात आता महाविकास आघाडीचं मोठं शक्तीप्रदर्शन; गांधी-ठाकरे-पवार एकत्र येणार?”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here