पुणे : ठाकरे कुटुंबीयांवर टीका करणं हेच नारायण राणे यांचं पोट भरण्याचं साधन आहे. अशी टीका विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. पिंपरी-चिंचवड महापालिकेत आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
टीका केल्यामुळेच राणेंना पदे व भाजपमधील वरिष्ठांच्या गाठीभेटी मिळत आहेत. त्यामुळे ठाकरे कुटुंबीयांवरील टीका हेच नारायण राणे यांच्या रोजी रोटीचे साधन आहे, तसेच नारायण राणे यांनी केवळ महिनाभर राणे यांनी ठाकरे कुटुंबियांवर टीका न करता गप्प बसून दाखवावं, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत.
एका उद्योगपतींनी माझी आणि उद्धव ठाकरे यांची भेट घडवून आणली होती. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीनंतर माझा शिवसेनेत प्रवेश निश्चित झाला. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत राणेंची मदत झाली असेलही, मात्र शिवसेना प्रवेशाबाबत केलेले राणे यांचे विधान सपशेल आहे. तसेच माझ्या शिवसेना प्रवेशाच्या खऱ्या माहितीसाठी सत्यशोधक समिती नेमावी लागेल, असंही नीलम गोऱ्हेंनी सांगितलं.
महत्वाच्या घडामोडी –
कोरोना काळात खचून न जाता राजेश टोपेंनी आपली भूमिका सार्थपणे निभावली- सुप्रिया सुळे
“लाचखोरी प्रकरणातील शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर यांचं अखेर निलंबन”
“सत्तेच्या लालसेपोटी ठाकरे सरकारला हिंदू सणांचाही विसर”
महाविकास आघाडी सरकार भूईसपाट होईल ; चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य