मुंबई : राज्यात विधानपरिषदेच्या धुळे-नंदुरबार एक, शिक्षक दोन आणि पदवीधर तीन अशा एकूण 6 जागांवर निवडणूक झाली. या एकूण जागांपैकी चार जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले. यानंतर भाजप नेत्यांनी शिवसेनेवर टीका केली. याला शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
आपलं अपयश झाकण्यासाठी शिवसेनेवर टीका करणे ही भाजपची केविलवाणी धडपड आहे,” असं म्हणत नीलम गोऱ्हे यांनी भाजपवर निशाणा साधलाय.
स्वत:चे अपयश झाकण्यासाठी शिवसेनेवर टीका करणे ही भाजपची केविलवाणी धडपड आहे. महाविकास आघाडीला स्थापन होऊन एक वर्ष झाले. या सरकारच्या माध्यमातून कोंडलेल्या लोकशाहीला मोकळा श्वास घेण्याची संधी मिळाली. पुढचेही एक पाऊल म्हणायचे झाले, तर या सरकारमुळे ‘फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश’ असे झाले आहे, असं निल्हम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, नागपूर आणि पुणे ही दोन मतदारसंघं दीर्घकाळापासून भाजपकडे होती. या मतदारसंघांतही महाविकास आघाडीच्या उमेदरवारांना विजय मिळाला आहे,असंही निलम गोऱ्हे म्हणाल्या.
महत्वाच्या घडामोडी-
तळोजा औद्योगिक वसाहतीतील कारखान्याला आग, अग्निशमन दलाच्या जवानाचा गुदमरुन मृत्यू
“संजय राऊत यांना लिलावती रूग्णालयातून डिस्चार्ज”
“भाजपच्या नेत्यांनी यापुढे झेपेल तितकंच बोलावं”
मित्रपक्षांनीच शिवसेनेच्या मृत्यूचा सापळा रचलाय; विधानपरिषद निकालांवरुन नितेश राणेंची टीका