Home महाराष्ट्र राज्यात राजकारणाचं गुन्हेगारीकरण सुरू, कुणालाच कुणाचा धाक उरला नाही- चंद्रकांत पाटील

राज्यात राजकारणाचं गुन्हेगारीकरण सुरू, कुणालाच कुणाचा धाक उरला नाही- चंद्रकांत पाटील

मुंबई : राज्यात राजकारणाचं गुन्हेगारीकरण सुरू झालं आहे. त्यामुळे राज्यात कुणालाच कुणाचा धाक उरला नाही, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील  यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. भाजपच्या कार्यकारिणीची बैठक आज पार पडली. त्यानंतर पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील बोलत होते.,

राजकारणाचं गुन्हेगारीकरण सध्या सुरू आहे. मधल्या काळात आंदोलनं झाली. त्यामुळे सरकारमध्ये बदल झाले. त्यानंतर महाराष्ट्र स्थिर झाला. राज्यात कायद्याची भीती निर्माण झाली होती. राज्याचं गुन्हेगारीकरण झालं नव्हतं. मात्र आता जगात जे जे काही गुन्हे आहेत. ते गुन्हे राज्यातील कोणत्या ना कोणत्या मंत्र्याशी जोडले गेले आहेत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

कॉन्स्टेबलला मारहाण असो, कुणाचा जावई ड्रग्ज कनेक्शमध्ये आहे, कुणाचं नाव दिशा सालियन बलात्कार आणि हत्याप्रकरणात आलंय, कुणाला पूजा चव्हाण प्रकरणात राजीनामा द्यावा लागला तर कुणाला लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये मुले होतात… ही यादी खूप मोठी आहे. असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधाला.

महत्वाच्या घडामोडी –

अन् चांगला फटका मारल्यानंतरही सिब्लीला व्हावे लागले दुर्दैवीरित्या बाद; पहा व्हिडिओ

“मराठा आरक्षणासाठी उद्या जालनामध्ये आक्रोश मेळावा”

विरोधकांनी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं चुकीचं आहे- संजय राऊत

प्रत्येक मृत्यूमागे एक रहस्य, सगळ्या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी होईल ना?; चित्रा वाघ यांचा सवाल