आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सिंधुदुर्ग : भाजप आमदार नितेश राणे न्यायालयाचा मोठा दणका दिलाय. शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणातील संशयित असलेल्या भाजपा आमदार नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे, त्यामुळे नितेश राणेंना कधीही अटक होऊ शकते.
हे ही वाचा : नितेश राणेंना मोठा दणका; सुप्रीम कोर्टानेही जामीन अर्ज फेटाळला
सतोष परब हल्ला प्रकरणात वॉरंट निघाल्यानंतर नितेश राणेंनी अटकपूर्व जामीनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली तिथे त्यांना पहिला दणका देत जामीन फेटाळला, त्यानंतर नितेश राणे यांनी हायकोर्टात धाव घेतली तिथे त्यांना दुसरा मोठा दणका बसला कारण हायकोर्टानेही नितेश राणेंना जामीन देण्यास नकार दिला, त्यानंतर राणेंनी शेवटचा पर्याय म्हणून सुप्रीम कोर्टात धाव घेतली. मात्र तिथेही त्यांना दिलासा मिळाला नाही.
दरम्यान, सुप्रीम कोर्टानेही राणेंचा जामीन अर्ज फेटाळत, राणेंना दहा दिवस अटकेपासून संरक्षण देत, पुन्हा सत्र न्यायालयाचा रस्ता दाखवला. त्यानंतर राणेंच्या जामीन अर्जावर काल आणि आज सुनावणी पार पडली. मात्र सत्र न्यायालयानेही राणेंचा जामीन अर्ज फेटाळत, नितेश राणेंच्या अटकेवर शिक्कामोर्तब केलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
छगन भुजबळांकडून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं खास स्वागत; राजकीय चर्चांना उधाण
मी तर म्हणते शिवसेनेच्या एकेकाला ठोका, सोडू नका; भाजप खासदार पूनम महाजन यांचा हल्लाबोल
“राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी कोरोनाला हरवलं, अवघ्या 7 दिवसांतच केली कोरोनावर मात”