Home महाराष्ट्र “कोल्हापूर उत्तरमध्ये मतमोजणीला सूरूवात, तिसऱ्या फेरीअखेर काँग्रेसच्या जयश्री जाधव आघाडीवर”

“कोल्हापूर उत्तरमध्ये मतमोजणीला सूरूवात, तिसऱ्या फेरीअखेर काँग्रेसच्या जयश्री जाधव आघाडीवर”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम यांना भाजपने उमेदवारी दिली होती. त्यामुळे आता या निकालाकडे सर्वाचेंच लक्ष लागले आहे.

हे ही वाचा : “कायम राष्ट्रवादीच्या विरोधात बोलणारा मी माणूस, पण पवार साहेबांमुळेच मी मंत्री झालो”

मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर दुसऱ्या फेरीपर्यंत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी आघाडी घेतली आहे. कसबा बावडा भागातून मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीत जयश्री जाधव या 2137 मतांनी आघाडीवर होत्या. जयश्री जाधव यांना 4856 तर भाजपच्या सत्यजित कदम यांना 2719 मते मिळाली. दुसऱ्या फेरीत जयश्री जाधव यांना 5515 तर सत्यजित कदम यांना 2513 मते मिळाली आहेत. तर तिसऱ्या फेरीमध्ये जाधव यांना 4928 तर सत्यजित कदम यांना 2566 मते मिळाली आहेत. त्यामुळे तिन्ही फेऱ्यानंतर जयश्री जाधव या 7501 मतांनी आघाडीवर आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

…तर कारवाई केली जाईल; राज ठाकरेंच्या भोंग्याच्या निर्णयावरून रूपाली पाटलांचा इशारा

खरंच मनसे भाजपासोबत युती करणार का?; शरद पवारांचं सूचक विधान, म्हणाले…

“पुणे दाैऱ्याआधीच राज ठाकरे झाले हिंदुजननायक; हनुमान जयंतीला वातावरण तापणार?”