“देगलूरच्या विजयानंतर देवेंद्र फडणवीसांकडून ठाकरे सरकारचा करेक्ट कार्यक्रम”

0
595

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नांदेड : भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी बोलताना पुन्हा एकदा सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

महाविकास आघाडीतील तीन्ही पक्षाने तन, मन, धनाने संपूर्ण ताकद झाकून दिली होती. मात्र आम्ही पंढरपूरची पोटनिवडणूक मोठ्या मतांच्या फरकाने जिंकलो होतो. तेंव्हा विरोधी पक्षनेते देंवेद्र फडणवीस यांनी या सरकारचा करेक्ट कार्यक्रम करणार असे जाहीर केले होते. त्यानुसार देगलूर-बिलोली पोटनिवडणुकीतील विजयानंतर फडणवीसांकडून या महाविकास आघाडी सरकारचा करेक्ट कार्यक्रम केला जाईल, असा दावा दरेकरांनी यावेळी केला. ते पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी नांदेड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

हे ही वाचा : “सरकारमध्ये थोडी जर चाड शिल्लक असेल, तर नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा”

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारबाबत जनतेच्या मनामध्ये असलेली चीड, संताप या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून बाहेर पडणार आहे. दलाली, बदल्या यातून पैसा आणि सत्ता यातच सत्ताधारी व्यस्त आहेत. त्यांना राज्यातील जनतेच्या प्रश्नाशी कुठलेच देणेघेणे नाही., अशी टीकाही दरेकरांनी यावेळी केली.

महत्वाच्या घडामोडी – 

“कोणाच्याही नादाला न लागता पंजाला मतदान करा, शेवटी तुमची कामे मीच करणार”

मुख्यमंत्री आणि शरद पवारांचा फोन; पुण्याचा दौरा अर्धवट सोडून अजित पवार मुंबईकडे रवाना

“राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग सूरूच; भंडाऱ्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here