“कोरोना पाॅझिटिव्ह असूनही शूटिंगला गेली; अभिनेत्री गाैहर खानवर गुन्हा दाखल”

0
189

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेनं अभिनेत्री गौहर खान हिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अभिनेत्री गौहर खानला कोरोनाची लागण झाली आहे आणि तिला क्वारंटाईन करण्यात आलं आहे. मात्र, गौहर खान शूटिंगसाठी गेली असल्याची माहिती समोर आली आहे.

ओशिवरा पोलिसांच्या माहितीनुसार, गौहरचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे तिला क्वारंटाईन करण्यात आलं होतं. महापालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, अंधेरीतल्या तिच्या घरी जेंव्हा ते गेले त्यावेळी तिथे कोणीही दार उघडलं नाही. आणि त्यानंतर हे कळालं की, ती बाहेर शूटिंगसाठी गेली आहे. आणि त्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी ओशिवरा पोलीस ठाण्याकडे धाव घेतली.

ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंडसंहितेच्या साथरोग नियंत्रण कायद्याअंतर्गत कलम 188, 269, 271, 51 ब अन्वये तिच्यावर गुन्हा दाखल केला असल्याचं मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आलं.

दरम्यान, त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून ट्विट करण्यात आलं आहे. ज्यात त्यांनी असं म्हटलंय की, शहराच्या सुरक्षेसंदर्भात कसलीही तडजोड केली जाणार नाही. करोना बाधित असतानाही कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं पालन न केल्याप्रकरणी बॉलीवूड अभिनेत्रीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नियम सर्वांसाठी सारखेच आहेत. आमची नागरिकांना विनंती आहे की या नियमांचं पालन करा आणि शहराला करोनाला हरवण्यासाठी मदत करा.

महत्वाच्या घडामोडी –

“भारत आणि इंग्लंडकडून कसोटी सामने खेळणारा ‘हा’ एकमेव क्रिकेटपटू तुम्हाला माहित आहे का?”

डियर शादी डाॅट काॅम…या मुलाला मुलगी शोधण्यासाठी मदत करा; नितेश राणेंचा वरूण सरदेसाईंना टोला

“राजस्थान हादरलं! एका अल्पवयीन मुलीवर सलग 9 दिवस 18 जणांनी केला बलात्कार”

सचिन वाझे प्रकरणी ज्यांच्यापर्यंत धागेदोरे जातील त्यांच्यावर कारवाई होणार – अजित पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here