मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या संपर्कात आलेल्या 14 जणांना करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. जितेंद्र आव्हाड सध्या होम क्वारंटाइनमध्ये आहेत. करोनाची लागण झालेल्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात आल्याने जितेंद्र आव्हाड यांनी स्वत:ला होम क्वारंटाइन केलं आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्यासहित अनेक मोठे पोलीस अधिकारी आणि एका वृत्तवाहिनीच्या पत्रकारालाही क्वारंटाइन होण्यास सांगण्यात आलं आहे. त्यानंतर आव्हाड यांनी खबरदारीचा उपाय म्हणून स्वत:ला क्वारंटाइन करून घेतलं.
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांचा मतदारसंघ असलेल्या कळवा-मुंब्रा परिसरात सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण असून, या भागात आव्हाड यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात मदतकार्य सुरू होते. तसेच तेथील पोलिसांशी संपर्क होता. याच दरम्यान करोनाचा संसर्ग झाल्याची शक्यता आहे.
महत्वाच्या घडामोडी-
पंतप्रधानांनी केली मोठी घोषणा; देशात 3 मेपर्यंत लॉकडाउन
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती यंदा ‘डिजिटल’ माध्यमातून साजरी करा- अजित पवार
शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गप्प का?- किरीट सोमय्या
“महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी हे कारस्थान झालं आहे”