मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सरकार अधिवेशनापासून म्हणजेच विरोधकांच्या आणि जनतेच्या प्रश्नापासून पळ काढत आहे, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. इथं कोरोना म्हणता आणि बाहेर तुमच्या मंत्र्यांचे सगळे कार्यक्रम सुरु आहे. तुमच्या मंत्र्यांना कुठलेच नियम नाहीत का?, नियम फक्त विरोधी पक्षासाठी आहेत का? असे प्रश्नही फडणवीसांनी केले आहेत. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तुफान फटकेबाजी केली. कोरोना व्हायरस म्हणतोय, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देत होते. यादरम्यान, मुनगंटीवार यांचे भाषण पाहून ‘नटसम्राट’ पाहत असल्याचा भास झाल्याचा टोलाही यावेळी त्यांनी लगावला.
महत्वाच्या घडामोडी –
…तर राष्ट्रपती राजवट हा एकच मार्ग- सुधीर मुनगंटीवार
“मोठी बातमी! तापसी पन्नू, अनुराग कश्यप यांच्या घरी इन्कम टॅक्सची धाड”
“तरूणीसोबत अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपच्या मंत्र्याचा राजीनामा”
“याॅर्करकिंग जसप्रित बुमराहची पडली विकेट, लवकरच अडकणार विवाहबंधनात”