सांगली : मंत्री विश्वजीत कदम यांच्या कुटुंबातील तीन व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. विश्वजीत कदम यांनी स्वत: फेसबुक पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.
घरातल्या तिघा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना पुण्यातल्या भारती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं गेलं आहे. बंधू, वहिनी आणि पुतण्याची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे.
माझा पुतण्या डॉ. जितेश कदम याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याचप्रमाणे माझे बंधू एच. एम. कदम आणि वहिनी यांचाही अहवाल पॉझिटिव्ह आहे. त्यांच्यावर योग्य वैद्यकीय उपचार सुरू आहेत. कोरोना संसर्गाचा मुकाबला करीत डॉ. जितेश हे पलूस-कडेगावसह सांगली-मिरज भागांमध्ये अहोरात्र सेवाकार्य करीत होते, असं विश्वजीत कदम यांनी सांगितलं आहे.
क्वारेन्टाईन भागांमधील नागरिकांच्या जेवणाच्या व्यवस्थेपासून सॅनिटायझर, अर्सेनिक अल्बम गोळ्यावाटप अशा अनेक आघाड्यांवर ते सर्वसामान्य जनतेला मदत करीत होते. त्यांची तब्येत ठीक असून मी स्वतः उपचारांवर जातीने लक्ष देत आहे. डॉ. जितेश हे लढवय्ये असून कोरोना संसर्गावर मात करून ते पुन्हा जनसेवेसाठी कार्यरत होतील, असा मला विश्वास आहे, असंही विश्वजीत कदम म्हणाले.
https://www.facebook.com/kadamvishwajeet/posts/3199667010129467
महत्वाच्या घडामोडी-
अयोध्येतील राम मंदिर निर्माणावर पार्थ पवारांनी दिल्या पत्राद्वारे शुभेच्छा; म्हणाले…
कधी येता कर्नाटकला?, मी मोकळाच आहे; नारायण राणेंचा संजय राऊतांना टोला
गुलाबराव पाटील मंत्री असून ह्याला कुत्रा विचारत नाही; निलेश राणेंचा पलटवार
“कोरोनाचं संकट दूर झाल्यावर राज्यात भाजपचं सरकार निश्चित येईल”