Home पुणे “राज्य सरकारच्या ‘या’ कारणामुळे कोरोना वाढला; रामदास आठवलेंचा ठाकरे सरकारवर आरोप”

“राज्य सरकारच्या ‘या’ कारणामुळे कोरोना वाढला; रामदास आठवलेंचा ठाकरे सरकारवर आरोप”

पिंपरीचिंचवड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात झालेल्या कोरोनाचा प्रादुर्भावावरून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

राज्य सरकारच्या बेशिस्तपणामुळे कोरोना वाढला आहे. भाजपसोबत दोन हात करू इच्छित असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनाचा सामना करू शकलेले नाहीत, अशी टीका रामदास आठवले यांनी केली.

20 हजार करोडचे पॅकेज देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला. पण महाराष्ट्र सरकारनं मात्र राज्यातील मजुरांना, शेतकऱ्यांना, उद्योपतींना, लघु उद्योजकांना मदत करण्यासंबंधी पाऊल उचलले नाही, असं रामदास आठवले म्हणाले.

दरम्यान, देशभरात कोरोनाचं संकट आहे. बाधितांचा आकडा तीन लाखांवर पोहोचला आहे. पिंपरी-चिंचवड आणि पुण्यात संख्या वाढत आहे. नागरिकांनी नियमांचं पालन करावं, असं आवाहन रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत बोलत असताना केलं.

महत्वाच्या घडामोडी-

“कोरोना संपल्यानंतर तुम्हाला रस्त्यावर फोडून काढल्याशिवाय गप्प बसणार नाही”

राज्यात तीन पक्षांचं सरकार, कोण निर्णय घेतंय हे त्यांचं त्यांनाच कळेना- रावसाहेब दानवे

तीन भावंडांमध्ये मतभेद असतात, आमचं तर तीन पक्षाचं सरकार

वाढदिवसाच्या दिवशीच अजिंक्य रहाणेकडून आदित्य ठाकरेंचं कौतुक; म्हणाला…