पुणे : बारामती येथील 72 वर्षीय मॅरेथॉनपटु लता करे यांचे पती भगवान करे यांचं कोरोनाने निधन झालं आहे. बारामतीमधील रुग्णालयात कोरोनाचे उपचार सुरु असताना त्यांच्या पतीचे निधन झाले
लता करे 2013 मध्ये बारामती शहरातील मॅरेथॉन स्पर्धेत धावल्या होत्या. लता करे यांनी पहिल्यांदा पतीच्या हृदयविकारावरील उपचारासाठी अनवाणी धावत प्रथम क्रमांक मिळविला होता. त्यानंतर त्या चर्चेत आल्या होत्या.
पतीच्या उपचारासाठी वयाच्या 64 व्या वर्षी धावणाऱ्या लता करे यांनी मिळविलेल्या विजयानंतर सर्वत्र कौतुक झाले त्यानंतर सलग तीन वर्ष त्यांनी वयाची तमा न बाळगता बारामती येथील आयोजित स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवित हॅट्रीक साधली होती.
दरम्यान, ज्या पतीला वाचविण्यासाठी लता करे मॅरेथॉन स्पर्धेत धावल्या होत्या त्यांच्या निधनामुळे करे यांची धाव आता कायमची थांबली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“उद्धव ठाकरेंची महाविकास आघाडीत घुसमट होत आहे, आज ना उद्या ते नक्की आघाडीतून बाहेर पडतील”
“आरोग्य विभागात भरती करण्याचा निर्णय आता घेतला जातोय, वर्षभर ठाकरे सरकार झोप काढत होतं का?”
“अशोक चव्हाणांना कायदा कळत नाही, त्यामुळे ते मराठा आरक्षणाच्या बाबतीत वेड पांघरून पेडगावला जात आहे”
“मराठा समाजाला कळून चुकलंय की, आरक्षणाच्या निर्णयाला पूर्णपणे महाविकास आघाडी जबाबदार”