Home महाराष्ट्र “रक्षा खडसेंबद्दल वादग्रस्त उल्लेख! गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपने चूक सुधारली”

“रक्षा खडसेंबद्दल वादग्रस्त उल्लेख! गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपने चूक सुधारली”

मुंबई : रावेर मतदारसंघातील भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्याबाबत भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर आक्षेपार्ह माहिती लिहिण्यात आली होती. यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर सर्व खासदारांची फोटोंसह माहिती देण्यात आली आहे. यामध्ये रक्षा खडसे यांच्या फोटोखाली होमोसेक्सुअल असं लिहिण्यात आलं होतं. यासंदर्भात स्क्रीनशॉट समोर येताच एकच खळबळ उडाली होती. अनिल देशमुख यांनी या प्रकरणाची दखल घेत भाजपला इशारा दिला. त्यानंतर भाजपने आपली चूक त्वरित दुरूस्त केली.

रक्षा खडसे यांच्याबद्दल अशी माहिती वाचून मला धक्का बसला. महिलांचा अशा प्रकारे अवमान करणाऱ्यांना महाराष्ट्र सरकार सोडणार नाही. भाजपने संबंधितांवर त्वरित कारवाई करावी, अन्यथा महाराष्ट्र सायबर सेलला या प्रकरणात लक्ष घालावं लागेल, असं अनिल देशमुख म्हणाले.

दरम्यान, हा प्रकार समोर येताच भाजपने त्वरित कार्यवाही केली व आपली चूक सुधारली.

महत्वाच्या घडामोडी-

काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकवलं आहे- प्रकाश जावडेकर

“देशद्रोही ठरवून वाऱ्यावर सोडणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही?”

“…हे म्हणजे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं”

शेतकऱ्यांवर टीका करणं कंगणाला पडलं महागात!