Home महाराष्ट्र महसुलासाठी वाईन शाॅपचा विचार करा; राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

महसुलासाठी वाईन शाॅपचा विचार करा; राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राज्यामध्ये महसुलाचा ओघ सुरु करण्याच्या दृष्टीने राज्यातील ‘वाईन शॉप्स’ सुरु करायला काय हरकत आहे? असा सवाल केला आहे.

राज यांनी उद्धव यांना लिहिलेल्या पत्रामध्ये राज्याचे अर्थचक्र पुन्हा सुरु करण्यासंदर्भातील काही मुद्दे उपस्थित केले आहेत. यामध्ये त्यांनी हॉटेलबरोबरच ‘वाईन शॉप्स’ सुरु करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने विचार करावा, अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे.

दरम्यान, ज्याची आर्थिक परिस्थिती सध्या बिकट आहे. कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाहीत. त्यामुळं महसुलाचा ओघ सुरू करण्याचा विचार आता सरकारनं करायला हवा,असं राज यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद आमदारकीचा प्रस्ताव बेकायदेशीर- चंद्रकांत पाटील

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरजेत माणुसकीला काळीमा फासणारी घटना

विरोधी पक्षनेत्याचं घर राजभवनाच्या दारात आहे का?; संजय राऊतांचा फडणवीसांना सवाल

आपण लढणार आपण जिंकणार; मुख्यमंत्र्याचा व्हिडीओतून ‘पॉवरफूल’ संदेश