निरुपयोगी झालं की काढून फेकायचं; मंत्रिपदावरून काँग्रेसचा अजित पवार गटाला टोला

0
6

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा सध्या होतोय. यात नरेंद्र मोदी यांच्यासह एनडीए सरकारमधील मंत्री शपथ घेत आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. यात राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेत्यांचा समावेश नाहीये. यावरुन विधानसभेचे विरोधी पक्षनेते, काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांना टोला लगवला आहे.

भाजपचे नेहमीच धोरण आहे उपयोगी आहे तोपर्यंत उपभोगात आणायचं. निरुपयोगी झालं की काढून फेकायचं. आता राष्ट्रवादी अजित पवार गटाची हीच स्थिती आहे त्यांची उपयुक्तता संपली आहे. हे भाजपने ठरविलं आहे. उपयुक्तता संपली की डस्टबिनमध्ये जातात, असं विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.

ही बातमी पण वाचा : नितीन गडकरींनी घेतली तिसऱ्यांदा कॅबिनेट मंत्री पदाची शपथ 

प्रभू रामचंद्राने अयोध्यामध्ये सुद्धा आशीर्वाद इंडिया आघाडीला दिला आहे. आता राष्ट्रवादी या दुखातून कसे सावरतात हे पाहावं लागणार आहे. राष्ट्रवादीचा एक खासदार आहे. एका खासदारावर त्यांना मंत्रिपद कसा देतील त्यांचे जेवढे आहे ते पाहूनच देणार एक वर राज्यमंत्री पद मिळत होतं. तर पाहिजे त्यांनी स्वीकाराला होतं जो मिला ओ ही सही अशी परिस्थिती आहे.  सुखके सब साथी मात्र दुःखात यांच्या कोण राहील हे येणारा काळ सांगेल, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

भाजपने मॅजिक आकडा पूर्ण केला आहे त्यामुळे हे राहिले काय आणि गेले काय त्यांना काही फरक पडणार नाही. मात्र त्यांची मजबुरी आहे. त्यांना राहावंच लागणार आहे. कारण हे इकडे परत येऊ शकत नाही आणि तिकडे दुखवू शकत नाही. धरलं तर चावते आणि पडलं तर धावतंय, अशी त्यांची अवस्था आहे. असंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

 अजित पवारांना मोठा धक्का; केंद्रीय मंत्रिमंडळात एकही जागा नाही

मोदी मंत्रिमंडळात कोण कोण सामील?; फायनल यादी आली समोर

शिंदे गटाचे अनेक पदाधिकारी आमच्या संपर्कात; ‘या’ काँग्रेस नेत्याचा गौप्यस्फोट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here