मुंबई : काँग्रेस नेते आणि मंत्री अस्लम शेख यांनी मुंबईला दोन आयुक्त देण्याची मागणी केली आहे. यावर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अतुल भातखळकर यांनी यासंदर्भात एक पत्रक काढलं आहे.
अस्लम शेख हे गेल्या 11 वर्षांपासून मालाडचं प्रतिनिधीत्व करत आहेत. त्यांच्या मतदारसंघातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या विभागात अनेक समस्या आहेत. त्या दूर कराव्यात असं त्यांना कधी वाटलं नाही. तसे प्रयत्नही त्यांनी केले नाहीत. परंतु, मी आमदार झाल्यापासून मालाड पूर्व, कुरार गाव, दिंडोशी येथील नागरिकांचे हेलपाटे थांबावे याकरिता वेगळा प्रशासकीय प्रभाग व्हावा यासाठी सतत पाठपुरावा करत होतो., असं भातखळकर म्हणाले.
माझ्या मागणीवरून मुंबई मनपाच्या पी/उत्तर वार्डचे विभाजन करून पी/पूर्व व पी/पश्चिम असे दोन प्रशासकीय प्रभाग करण्याचा निर्णय मुंबई मनपाने घेतला आहे. माझ्या या कामामुळे पोटशूळ उठल्यानेच शेख यांनी आता मुंबईला 2 पालिका आयुक्त नेमण्याची मागणी केल्याचा आरोप भातखळकरांनी केला आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व गुजरातचे माजी मुख्यमंत्री माधवसिंह सोलंकी यांचं निधन”
“…त्यामुळे सर्व महापालिकेवर भाजपचाच महापौर होणार”
“…तर हे सरकारच केंद्रामध्ये उचलून ठेवा”
“भंडारा घटनेवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सरकारकडे केली ‘ही’ महत्त्वाची मागणी”