आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नांदेड : नांदेडमधील देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर विजयी झाले. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते तथा सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली. ते नांदेडमध्ये बोलत होते.
हे ही वाचा : “उद्धव ठाकरे पंतप्रधान होणारच! शिवसेनेची दिल्लीकडे वाटचाल सुरु”
“महाराष्ट्रात यावेळी काँग्रेसला पूर्वीपेक्षा जास्त मतदान मिळाले. राजस्थानमधील दोन्ही जागा काँग्रेसने जिंकल्या. हा विजय काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा विजय आहे. भाजपने खालची पातळी गाठून प्रचार केला होता. त्याला देगलूर बिलोलीच्या जनतेने साथ दिली नाही. आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन निवडणूक लढवली. हा विजय लोकांचा विजय आहे,” असं अशोक चव्हाण म्हणाले आहेत.
दरम्यान, शंकरराव चव्हाण यांच्या पुण्याईला लोकांनी नेहमीच साथ दिली आहे. हा लोकांचा विजय आहे, असंही अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“दादरा नगर हवेलीवर शिवसेनेचा भगवा फडकला; कलाबेन डेलकर यांचा 50 हजार मतांनी विजय”
फटाके जरूर फोडा, पण धूर काढू नका; बारामतीत मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला
“देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणूक! काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 10 हजार मतांनी आघाडीवर”