बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनी काँग्रेसश्रेष्ठींनी साधं ट्विटही केलं नाही- नितेश राणे

0
211

मुंबई : काल दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन होता. यावरुन भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना आणि काँग्रेस यांच्यावर निशाणा साधला आहे.

काल बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन होता. मात्र, संपूर्ण दिवसभरात काँग्रेसच्या शीर्षस्थ नेत्यांकडून बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी संदेश किंवा साधे ट्विटही करण्यात आले नाही. काँग्रेस बाळासाहेब ठाकरे यांचीच दखल घेणार नसेल तर मग शिवसेनेकडे उरले तरी काय, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांचा आठवा स्मृतीदिन सोहळा मंगळवारी संपन्न झाला. यानिमित्ताने राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना आदरांजली वाहिली.

महत्वाच्या घडामोडी-

भाजपनं राजकारणासाठी देवालाही सोडलं नाही- सचिन सावंत

“राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ खडसेंना डोक्यावर चढवलंय”

…म्हणून महाराष्ट्रात परत एकदा फडणवीस सरकार पाहिजे- नितेश राणे

आंदोलन केले की अटक, कुणी काही बोलले की अटक, हे थांबणार केव्हा?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here