संविधान व देशाला वाचविण्यासाठी काँग्रेस पक्षच सक्षम पर्याय आहे, असं वक्तव्य महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. आदिवासी विकास प्रकल्प विभागाच्या वतीने पिटेझरी व मालू टोला गावात खावटी अनुदान वाटप कार्यक्रमाप्रसंगी नाना पटोले बोलत होते.
देशात काँग्रेसने प्रदीर्घकाळ लोकशाही टिकवून ठेवली आहे. परंतु 2014 पासून केंद्रात सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाला संपविण्याच्या प्रयत्न सुरू केला आहे. संविधानाच्या आधारावर काँग्रेसने सत्तेचा उपयोग देशातील सर्वसामान्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता केला. मात्र आत्ताच्या केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी देश विकायला काढला आहे, असं नाना पटोले म्हणाले आहेत.
देशातील सध्याची परिस्थिती खराब आहे. संविधान सुरक्षित ठेवणे गरजेचे असून संविधान संपले तर देशातील लोकशाही व्यवस्था संपेल आणि संविधान व देशाला वाचविण्यासाठी काँग्रेस पक्षच सक्षम पर्याय आहे, असं नाना पटोलेंनी यावेळी म्हटलं.
दरम्यान, काँग्रेसची विचारधारा राज्यातील जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी पक्षश्रेष्ठींनी साकोली विधानसभा क्षेत्रातील जनतेने पाठविलेल्या तुमच्या लोकप्रतिनिधीवर सोपविली आहे. काँग्रेसची विचारधारा हीच देशाला वाचवू शकते म्हणून संपूर्ण राज्यभर दौरे सुरू आहेत. ही भविष्याची तयारी असून माझ्या क्षेत्रातील जनतेनी दिलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडत आहे, असंही नाना पटोले म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
प्रवीण दरेकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; चर्चांना उधान
हे आमच्या घटनेचे दुर्दैव; संजय राऊतांचा राज्यपालांवर निशाणा
तुमच्यामुळं जबाबदारी मिळाली आहे, मी जबाबदारीतनं पळणारा नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
अगर आप करते रहोंगे हाऊस मे दंगा, तो कर देंगे एकदिन आपको नंगा; आठवलेंचा कविता शैलीत विरोधकांना इशारा