Home नागपूर “काँग्रेस पक्षाला स्वत:ची मतं राखता आली नाहीत, ते उद्या राज्याचे नेतृत्व काय...

“काँग्रेस पक्षाला स्वत:ची मतं राखता आली नाहीत, ते उद्या राज्याचे नेतृत्व काय करणार?”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नागपूर : नागपूर आणि अकोला-वाशिम विधानपरिषद मतदारसंघाचा निकाल आज जाहीर झाला असून या दोन्ही जागांवर भाजपने जोरदार विजय मिळवला आहे. यावरून भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया देत महाविकास आघाडी व काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.

हे ही वाचा : “बावनकुळेंच्या विजयाने महाविकासआघाडीला चपराक बसली”

महाराष्ट्रात राज्य सरकार कारभार करण्यात अपयशी ठरले आहे. अकोला आणि नागपूर विधानपरिषद निवडणुकीच्यानिमित्ताने जनतेने हे दाखवून दिले., अशी टीका प्रवीण दरेकरांनी यावेळी केली. ते माध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीत महाविकासआघाडीला नागपूर आणि अकोला-वाशिमची जागा राखता आली नाही. या निवडणुकीत त्यांची मतंही फुटली. त्यामुळे ज्यांना स्वत:च्या जागा आणि पक्षाची मतं राखता आली नाहीत, ते उद्या राज्याचे नेतृत्व काय करणार, असा हल्लाबोलही दरेकरांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

“शिवसेनेचा भाजपला दे धक्का; कट्टर राणे समर्थकानं हाती बांधलं शिवबंधन”

भाजपचा शिवसेनेला धक्का; अकोला विधान परिषद निवडणुकीत भाजपचे वंसत खंडेलवाल विजयी

नागपूर विधान परिषद निवडणूक; काँग्रेसला धक्का, भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे विजयी