आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : काँग्रेस पक्ष देशातील सर्वात जुना व अनुभवी पक्ष असून देशाची लोकशाही व संविधान हे काँग्रेसच वाचवू शकते. लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी काँग्रेस पक्ष संघटना बळकट झाली पाहिजे, असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. टिळक भवन येथे महाराष्ट्र प्रदेश एनएसयुआयची आढावा बैठक पार पडली. या बैठकीला नाना पटोले मार्गदर्शन करत होते.
राज्यात काँग्रेस पक्षाला क्रमांक एकचा पक्ष करण्याचा निर्धार केला आहे, यासाठी एनएसयुआयच्या युवाशक्तीने पूर्ण ताकदीने काम करुन काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त करुन देण्यात योगदान दिलं पाहिजे. तरुण हे देशाचे भविष्य आहेत. आपला देश हा तरुणांची जास्त संख्या असलेला देश असून देशाचे भविष्य तुमच्या हातात आहे. तुम्ही काँग्रेस पक्षाची उद्याची ताकद आहात, असं नाना पटोले म्हणाले आहेत.
सामान्य माणसातून नेतृत्व उदयाला आले पाहिजे, यासाठी एनएसयुआयनेही तालुका पातळीपर्यंत जाऊन विस्तार केला पाहिजे, जनसंपर्क वाढवला पाहिजे, एनएसयुआयच्याही बुथ कमिट्या बनवल्या पाहिजेत. तुमच्यातून पक्षाचे नेतृत्व पुढे आले पाहिजे त्यासाठी ताकदीने कामाला लागा, असं आवाहन नाना पटोले यांनी यावेळी केलं.
दरम्यान, या बैठकीत राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, किसान काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम पांडे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस विनायक देशमुख, एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष अमिर शेख व एनएसयुआयचे पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या प्रदेश कार्यालयात टिळक भवन, दादर (मुंबई) येथे आज सकाळी NSUI च्या प्रदेश व जिल्हा स्तरावरील प्रमुख पदाधिकारींचा संघटनेबाबत आढावा बैठक घेण्यात आले.
यावेळी राज्यमंत्री ना. विश्वजीत कदम, NSUI प्रदेशाध्यक्ष अमीर शेख तसेच पदाधिकारी उपस्थित होते. pic.twitter.com/COdZn68oIG— Nana Patole (@NANA_PATOLE) October 5, 2021
महत्वाच्या घडामोडी –
नारायण राणेंनी वेंगुर्ला पालिकेत फडकवला भाजपचा झेंडा; महाविकास आघाडीला चारली धूळ!
गुजरातमध्ये 21 कोटींचे ड्रग्ज सापडलं त्याचं काय?; संजय राऊतांचा सवाल
उत्तर प्रदेश हे राम राज्य नाही, तर किलींग राज्य; ममता बॅनर्जींचा हल्लाबोल
आगामी काळात शिवसेना बॅक टू पॅव्हेलियन होऊ शकते; रामदास आठवलेंच्या विधानानं राजकीय चर्चांना उधाण