मुंबई : काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांचं कोरोनामुळं निधन झालं आहे.
गेल्या काही दिवसांपासून ते कोरोनाशी झुंज देत होते. पुण्यातील जहांगीर रुग्णालयात मागील 20 दिवसांपासून उपचार सुरू होते. सुरूवातीला त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मात्र, नंतर त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती काँग्रेसकडून देण्यात आली होती.
दरम्यान, 2 दिवसांपासून त्यांची प्रकृती पुन्हा खालावली होती. त्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवल्याचंच वृत्त काँग्रेसकडून देण्यात आलं.
महत्वाच्या घडामोडी –
सांगली जिल्ह्यातील लाॅकडाऊन वाढला; पालकमंत्री जयंत पाटील यांची घोषणा
“देशाचं रूपांतर स्मशानभूमीत करणाऱ्या पंतप्रधान मोदींना पत्र लिहिण्याचे धाडस फडणवीसांनी करावं”
पांढऱ्या पायाचं सरकार आलं आणि मराठा समाजाचं आरक्षण रद्द झालं; सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
“अशोक चव्हाणांना राग येतो म्हणून आम्ही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर गप्प बसणार नाही”