अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. या प्रकरणात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देत मोठं विधान केलं आहे.
शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीनंतर देशामध्ये यूपीए सरकार स्थापन होईल आणि त्याचे नेतृत्व शरद पवार करतील, अशा चर्चा सुरू आहेत. असं असेल तरीही काँग्रेस पक्ष हा यूपीएचा आत्मा आहे आणि त्यामुळेच काँग्रेस पक्षाचाच पंतप्रधान होईल, असं दोनदा प्रशांत किशोर यांनीच सांगितलं आहे, असं नाना पटोलेंनी म्हटलं.
दरम्यान, नाना पटोले अमरावतीमध्ये पत्रकरांशी बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी –
…त्यामुळे एक दिवस अजित पवारच हे सरकार पाडतील- रामदास आठवले
“पायी वारीत वारकऱ्यांच्या केसालाही धक्का लागला तर गाठ ‘भाजपशी’ हे सरकारनं लक्षात ठेवावं”
संजय राऊतांच्या मार्गदर्शनाखाली आमची वाटचाल सुरू; नाना पटोलेंचा टोला
अखेर कोरोना लसीचा पहिला डोस घेतला; अमृता फडणवीसांनी फोटो शेअर करत दिली माहिती