Home महाराष्ट्र काँग्रेस आता स्वबळावर लढणार, मुंबई महापालिकेच्या 236 जागांवर उमेद्वार देणार- भाई जगताप

काँग्रेस आता स्वबळावर लढणार, मुंबई महापालिकेच्या 236 जागांवर उमेद्वार देणार- भाई जगताप

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुख्यमंत्रीपदावरून झालेल्या नाराजीवर शिवसेनेनं भाजपसोबतची युती तोडली. याचा फायदा घेत राष्ट्रवादीनं शिवसेना आणि काँग्रेसशी युती करत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करत राज्यात सत्ता स्थापित केली. मात्र, निवडणुका कशा लढायच्या यासंदर्भात तीन पक्षांची वेगळी भूमिका दिसून आली आहे. यावरून आता काँग्रेसनं आता स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा : भाजपाचा काँग्रेसला मोठा धक्का; काँग्रेसच्या दोन आमदारांसह माजी खासदार भाजपच्या गळाला

मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. काँग्रेस स्थापना दिनाच्या निमित्तानं मुंबई काँग्रेसच्या वतीनं आझाद मैदानात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाई जगताप यांनी पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला आहे.

मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय की, काँग्रेस मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार आणि आजही हेच सांगतो. 236 जागांवर काँग्रेस उमेदवार निवडणूक लढवेल”, असं भाई जगताप म्हणाले. तसेच काँग्रेसचं गतवैभव परत आणण्याचा आम्ही मुंबईत प्रयत्न करु, असा दावा भाई जगताप यांनी यावेळी व्यक्त केला.

महत्वाच्या घडामोडी – 

“महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षात फक्त वाझे वसुली योजना राबवली”

 “भाजप नेते हर्षवर्धन पाटलांची लेक झाली ठाकरे घराण्याची सून; निहार ठाकरे-अंकिता पाटील अडकले विवाहबंधनात”

ठाकरे सरकार पळपुटं सरकार, हे आज सिद्ध झालंय; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल