“अभिनंदन टीम इंडिया, तुम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम केलात; जयंत पाटलांकडून हाॅकी संघाला हटके शुभेच्छा”

0
416

मुंबई : ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने इतिहास घडवला आहे. कांस्य पदकासाठी झालेल्या सामन्यात भारताने जर्मनीवर 5-4 असा विजय मिळवत तब्बल 41 वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये हॉकी खेळात पदक जिंकलं आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देत भारतीय हॉकी संघाचं काैतुक केलं आहे.

अभिनंदन टीम इंडिया. 3-1 ने पिछाडीवर असूनही तुम्ही आपली शांतता राखली आणि योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम केलात. आज 41 वर्षाने हॉकी संघाला कांस्यपदक मिळवता आले आहे. हॉकी संघाने मिळवलेलं हे यश भारतीयांचा उर भरून आणणारे आहे, असं ट्विट करत जयंत पाटील यांनी भारतीय हाॅकी संघाला हटके अंदाजामध्ये शुभेच्छा दिल्या आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

” हाॅकीत ऑलिम्पिकमध्ये भारताला तब्बल 41 वर्षानंतर पदक; भारताचा जर्मनीवर 5-4 ने विजय”

जिथं सत्ता नाही, तिथं भाजप राज्यपालांच्या माध्यमातून सत्ता राबवतंय- संजय राऊत

“मनसे असो वा राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप त्यांच्याशी युती करणारच नाही”

“शिवसेनेत घेतले नाही म्हणून चित्रा वाघ यांचा जळफळाट”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here