अयोध्येतील राम मंदिर निर्माणावर पार्थ पवारांनी दिल्या पत्राद्वारे शुभेच्छा; म्हणाले…

0
250

मुंबई : अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी पत्र लिहून राम मंदिरावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसंच अयोध्येत राम मंदिर निर्माणाला शुभेच्छाही दिल्या आहेत.

अयोध्येत श्री राम जन्मभूमीचे भुमिपूजन होत आहे. श्रद्धा आणि सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक असलेले श्री राम अखेरीस शांतपणे आपल्या घरी येतील. हा लढा कडवट आणि प्रदीर्घ होता. अखेरीस एक पूर्ण पिढी एका ऐतिहासिक दिवसापशी येऊन ठेपली आहे. त्यामुळे आपण हिंदू श्रद्धेच्या पुनर्स्थापनेचा क्षण अनुभवणार आहोत, असं पार्थ पवार म्हणाले.

दरम्यान, राम जन्मभूमीच्या या जुन्या प्रकरणावर लोकशाही व्यवस्थेअंतर्गत सामंजस्य आणि शांततामय मार्गाने तोडगा निघाला हेही आपण पाहिलं. यातून आपल्याला एक बोध घेता येईल. या देशाच्या ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यांनी काही संस्था उभ्या केल्या. त्या संस्थांवर आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि संयमाने वागले पाहिजे. आपण राम जन्मभूमी प्रकरणातून एक मोठा धडा शिकला पाहिजे, असंही पार्थ पवार यांनी या पत्रात म्हटलंय.

महत्वाच्या घडामोडी-

कधी येता कर्नाटकला?, मी मोकळाच आहे; नारायण राणेंचा संजय राऊतांना टोला

गुलाबराव पाटील मंत्री असून ह्याला कुत्रा विचारत नाही; निलेश राणेंचा पलटवार

“कोरोनाचं संकट दूर झाल्यावर राज्यात भाजपचं सरकार निश्चित येईल”

बाप-बेटे घरी बसून आहेत, पार्ट्यांना जातात पण कॅबिनेटला नाही; नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here