Home महाराष्ट्र मुख्यमंत्रीपदाचा हंगामी का होईना, ताबा मिळाला, त्यासाठी शुभेच्छा; मनसेचा अजित पवारांना टोला

मुख्यमंत्रीपदाचा हंगामी का होईना, ताबा मिळाला, त्यासाठी शुभेच्छा; मनसेचा अजित पवारांना टोला

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरला. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीवर विरोधी पक्ष भाजपने आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत विरोधकांना गप्प केलं.

हे ही वाचा : “मोठी बातमी! 2 जानेवारीला होणारी MPSC ची परीक्षा पुन्हा पुढे ढकलली, पुढील तारीख लवकरच होणार जाहीर”

आमची सर्वांची इच्छा होती की, मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनाला यावं. चहापानाच्या कार्यक्रमावेळी पत्रकार परिषदेत स्टँपवर लिहून देऊ का असा दावा मी केला होता. पण कधीकधी सर्वच गोष्टी मनासारख्या घडत नसतात. गावाकडे म्हटलं जातं स्टॅम्पवर लिहू देऊ का? त्या पद्धतीने मी म्हणालो होतो., असं अजित पवारांनी काल विधानसभेत बोलताना म्हटलं होतं. यावरून आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्रा मध्ये गाजलेल्या बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील बनावट स्टॅम्प पेपर बहुधा उपमुख्यमंत्रांकडे आला असावा, नाहीतर तोंडावर आपटले नसते. असो मुख्यमंत्री पदाचा हंगामी का होईना ताबा मिळाला त्यासाठी शुभेच्छा., असा टोला संदीप देशपांडे यांनी अजित पवारांना लगावला.

महत्वाच्या घडामोडी – 

काँग्रेस आता स्वबळावर लढणार, मुंबई महापालिकेच्या 236 जागांवर उमेद्वार देणार- भाई जगताप

भाजपाचा काँग्रेसला मोठा धक्का; काँग्रेसच्या दोन आमदारांसह माजी खासदार भाजपच्या गळाला

“महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षात फक्त वाझे वसुली योजना राबवली”