मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करत थेट कानाखाली खेचण्याची भाषा केली होती. यानंतर मुंबईत युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार निदर्शने करण्यात आली.
वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेचे कार्यकर्ते नारायण राणे यांच्या जुहूतील निवासस्थानी जमले होते. यावेळी वरुण सरदेसाई यांनी आक्रमक शैलीत राणे कुटुंबीयांना आव्हान केलं. यावेळी युवासेना आणि राणे समर्थकांमध्ये प्रचंड राडा झाला. यावेळी पोलिसांना मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज करावा लागला. यावेळी युवासेनेचे अनेक कार्यकर्ते पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये जखमी झाले.
दरम्यान, वरुण सरदेसाईंच्या नेतृत्त्वात युवा सेनेच्या मुंबई कार्यकारिणीने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची ‘वर्षा’ येथे भेट घेतली. यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना स्टाईलने आंदोलन करणाऱ्या युवासेना पदाधिकारी आणि युवासैनिकांची पाठ थोपटून कौतुक केलं.
महत्वाच्या घडामोडी –
राणेंच्या अटकेनंतर भाजप आक्रमक, उद्या संपूर्ण राज्यात आंदोलन करण्यात येणार; चंद्रकांत पाटलांचा इशारा
नारायण राणेंच्या अटकेसाठी मंत्री अनिल परबांचा पोलिसांना आदेश; व्हिडीओ होतोय व्हायरल?
“गृहमंत्री दिलीप वळसे पाटील अचानक वर्षा बंगल्यावर; राणे प्रकरणावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा?”
महाराष्ट्राचा पश्चिम बंगाल करण्याचा भाजपचा कुटील डाव; नाना पटोलेंचा हल्लाबोल