शरद पवार आणि उद्धव ठाकरे अर्जुनासारखे गोंधळलेले- संभाजी भिडे

0
267

सांगली : शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे अर्जुनासारखे गोंधळलेले आहेत. असं म्हणत शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पत्रकार परिषद घेत राम मंदिर भूमिपूजन, शिवसेनेची भूमिका, कोरोना यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

शरद पवार इतके ज्ञानी असून राम मंदिराबाबत ते असे बोलले कसे? राजकीय चलाकीच असली तरी, राष्ट्रीयदृष्ट्या त्यांचं वक्तव्य पाप आहे, असं म्हणत संभाजी भिडे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

दरम्यान, शिवसेना या देशात असलीच पाहिजे, हिंदुत्वासाठी शिवसेना आवश्यक आहे. उद्धव ठाकरे हे निस्वार्थी परंपरेतील आहेत. कोरोनाच्या थैमानात उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण राज्यभर फिरुन कोरोना युद्धात सामर्थ्य निर्माण करावं आणि करतील अशी आशा आहे. ठाकरे म्हणजे तेजस्वी, असं संभाजी भिडे यांनी यावेळी नमूद केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

मनसेच्या अविनाश जाधवांचा जामीन अर्ज फेटाळला

…तर मुंबई पोलिसांची सिक्युरिटी कव्हर सोडून द्या; शिवसेनेचं अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर

राजेश टोपेंच्या कर्तव्यनिष्ठेपुढे मला आधी लगीन कोंढाण्याचं म्हणणाऱ्या तानाजीची आठवण येते- रोहित पवार

… तर तुला लोक रस्त्यावरती तुडवतील; निलेश राणेंची संजय राऊतांवर आक्षेपार्ह टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here