Home महाराष्ट्र येत्या 15 फेब्रवारीपासून महाविद्यालये सुरू होणार- उदय सामंत

येत्या 15 फेब्रवारीपासून महाविद्यालये सुरू होणार- उदय सामंत

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आलेली राज्यातील महाविद्यालयं पुन्हा सुरु केली जाणार आहे, अशी महत्त्वपूर्ण घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली आहे.

राज्यातील महाविद्यालय सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत होती याबाबत काही बैठका देखील झाल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे येत्या 15 फेब्रुवारी पासून महाविद्यालय सुरू होणार आहे. सध्या 50 टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये महाविद्यालय सुरू होणार, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.

दरम्यान, विद्यार्थी 75 टक्के उपस्थिती अनिवार्य असली तरी यावर्षी तसं राहणार नाही याबाबत जीआर काढण्यात आला आहे, असं उदय सामंत म्हणाले. जे महाविद्यालयात येऊ शकत नाही त्यांना ऑनलाईन क्लासेसचा पर्याय उपलब्ध राहील, असंही उदय सामंत यांनी सांगितलं. तसेच युजीसी गाईडलाईन्सनुसार राज्य सरकारने महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी दिली आहे, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“शिवरायांना अभिवादन करताना योगींना आधी चप्पल काढायला शिकवा”

…तर अजित पवार बारामतीत सुद्धा फिरू शकणार नाहीत; निलेश राणेंचा हल्लाबोल

“भाजप हा बलात्काऱ्यांचा पक्ष आहे असं चित्रा वाघच म्हणाल्या होत्या”

शरजील उस्मानी ठाकरे सरकारचा जावई आहे का?- अतुल भातखळकर