Home जळगाव भाजपमधील सामूहिक नेतृत्त्व संपलंय, आता एकाधिकारशाहीने निर्णय घेतले जातात- एकनाथ खडसे

भाजपमधील सामूहिक नेतृत्त्व संपलंय, आता एकाधिकारशाहीने निर्णय घेतले जातात- एकनाथ खडसे

जळगाव : भाजपमध्ये पूर्वी अस्तित्वात असलेली सामूहिक नेतृत्त्वाची परंपरा संपुष्टात आली आहे. आता पक्षात केवळ एकाधिकारशाहीने निर्णय घेतले जातात, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय.

पूर्वीच्या कालखंडातील आमचे नेते सामूहिक नेतृत्त्वाच्या अनुषंगाने काम करायचे. सर्वांशी सल्लामसलत करुन निर्णय व्हायचा. पण अलीकडच्या काळात भाजप व्यक्तीकेंद्रित झाली आहे. एकाच व्यक्तीने निर्णय घ्यावा आणि त्याची अंमलबजावणी करावी, असा कारभार सुरु आहे. निर्णय आधीच ठरलेला असतो, फक्त नावापुरते विचारलं जातं, असं एकनाथ खडसे म्हणाले.

दरम्यान, थोड्याचवेळात ते मुक्ताईनगरमधून मुंबईच्या दिशेने रवाना देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर पक्षातील अनेक नेते नाराज आहेत. परंतु, हे नेते समोर येऊन बोलत नाहीत. एवढेच काय भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेदेखील देवेंद्र फडणवीस यांना विचारल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत, असंही खडसे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

राॅयल चैलेंजर्स बेंगलोरची विजयी दाैड कायम; कोलकाता नाईट रायडर्सवर 8 विकेट्सनी मात

“एकनाथ खडसे निष्ठावंत नाहीत, त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर देणार”

मोहम्मद सिराज-युझवेंद्र चहलची घातक गोलंदाजी: कोलकाताचे आरसीबीसमोर 85 धावांचे लक्ष्य

“…म्हणून प्रविण दरेकर यांना झाले अश्रू अनावर”