मुंबई : महाराष्ट्रातील कोरोनाचा आकडा 3 हजाराच्या वर गेला आहे, रुग्ण वाढ आणि मृत्यूला हे सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जबाबदार आहे, असं म्हणत भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रातील मृतांची संख्या वाढतेय याची चीड येतेय, अन्य राज्यांनी त्यावर नियंत्रण मिळवलं, मग प्रगत महाराष्ट्राला का जमत नाही? हे सरकार सपशेल फेल आहे. धारावीसारख्या ठिकाणी ज्या उपाययोजना करायला हव्या होत्या त्या महाराष्ट्र सरकारने केल्या नाहीत, केरळ, राजस्थानमध्ये जे झालं ते महाराष्ट्रात झालं नाही, तशी खबरदारी मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये घेतली नाही, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रात तीन पक्षांचं हे सरकार आहे, या सरकारचं कौतुक कशाबद्दल करायचं? बाकीच्या राज्यातील आकडे बघा आणि महाराष्ट्रातील कोरोनाचे आकडे बघा. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांना विनंती करतो की महाराष्ट्रात तातडीने लष्कर पाचारण करा, असं म्हणत नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टिका केली आहे.
महत्वाच्या घडामोडी-
ही वेळ ‘ब्लेमगेम’ची नाही; अशोक चव्हाण यांचं फडणवीसांना उत्तर
“आम्हालाही मदत करा; पाकिस्तानने भारताकडे मागितला मदतीचा हात”
वांद्र्यामधील घटना पूर्वनियोजित होती- किरीट सोमय्या
सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना शरद पवारांनी केली ‘ही’ विनंती