Home महाराष्ट्र “अनलाॅकबाबत मुख्यमंत्र्यांकडून नवी नियमावली जारी; वाचा काय सुरू, काय बंद?”

“अनलाॅकबाबत मुख्यमंत्र्यांकडून नवी नियमावली जारी; वाचा काय सुरू, काय बंद?”

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या आकडेवारीत घट होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमधून अनलॉकची मागणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नवी नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये राज्यातील 11 जिल्ह्यात निर्बंध कायम ठेवले आहेत.

सर्व प्रकारची दुकानं, शॉपिंग मॉलसह रात्री 8 वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी असणार आहे. मात्र शनिवारी दुकानं दुपारी 3 वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार आहेत. सर्व मैदानं आणि बागा सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. तसेच सरकारी आणि खाजगी कार्यालये पूर्ण क्षमतेने चालवण्यास परवानगी असणार आहे.

जिम, योगा केंद्र, सलून, ब्युटी पार्लर, स्पा 50 टक्के क्षमतेनं सोमवार ते शुक्रवार सुरु ठेवता येणार आहेत. तर हे सर्व शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत आणि रविवारी दुकाने पूर्णपणे बंद असणार आहेत. तसेच मुंबईमधील लोकलसेवा अद्यापही बंद ठेवण्यात आली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“संजय राठोडांविरोधात पुरावा?; चित्रा वाघ म्हणाल्या….”

“MPSC चा ‘तो’ विषय आता सरकारकडे नाही तर राज्यापालांकडे प्रलंबित”

दिलेला शब्द पाळणारा अजित पवारांसारखा दुसरा नाही, पण…; चंद्रकांत पाटलांचा टोला

“नारायण राणेंनी शिवसेना सोडली, तेंव्हा संजय राऊत बाथरूममध्ये लपले होते”