मुख्यमंत्री, कोरोना काय फक्त रात्री फिरतो का? नाईट कर्फ्युवरून मनसेचा शिवसेनेला टोला

0
339

मुंबई : ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील महानगरपालिका क्षेत्रात उद्यापासून रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर मनसे सरचिटणीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते टी.व्ही.9 मराठीशी बोलत होते.

मुख्यमंत्री, कोरोना काय फक्त रात्री फिरतो का? दिवसा होत नाही का? नाईट कर्फ्यूचं कारण काय आहे? असे अनेक सवाल करत संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. तसेच तुम्ही नाईट पार्ट्या करता, ते चालतं, मग लोकांना बंधन का? कोण कुठे पार्ट्या करतं, हे सर्वांना माहीत आहे, असा टोलाही संदीप देशपांडेंनी यावेळी लगावला.

तुमची night life ती night life आणि जनतेची पार्टी करो ना!, असं ट्विट करत संदीप देशपांडेंनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

सत्तेचा मटका अन् खत्रीचे आकडे; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

“आम्ही कोणालाही झटके देत नाही, अनेकजण शिवसेनेत यायला तयार आहेत”

“मी मुख्यमंत्री असतो तर बच्चू कडूंचा राजीनामा घेतला असता”

भाजपला टीकेबद्दल ‘भारतरत्न’ द्यायला हवा; संजय राऊतांचा टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here