Home महाराष्ट्र शिवाजी विद्यापीठाचं नाव बदलण्याची मुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे मागणी

शिवाजी विद्यापीठाचं नाव बदलण्याची मुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे मागणी

मुंबई : कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचं नाव शिवाजी विद्यापीठ बदलून ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’, असं करण्यात यावं. अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्याकडे केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यामुळे त्यांचा योग्य तो सन्मान राखणे गरजेचं आहे. त्यांचं कर्तृत्व केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नही. तर सर्व भारतीयांच्या मनात त्यांच्याविषयी आदराची भावना आहे. म्हणून त्यांचा एकेरी उल्लेख टाळण्यासाठी हा बदल करावा, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

केवळ शिवाजी महाराजच नव्हे तर राज्याच्या सर्व आदरणीय महापुरुष आणि दैवतांच्या नावाने असणाऱ्या शासकीय योजना, कार्यक्रम, ठिकाणे यांचा नामविस्तार करून त्यांच्या संपूर्ण नावाचा उल्लेख करुन बदल करावा, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

यापूर्वी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि रेल्वे स्थानकाच्या नावात देखील छत्रपती शिवाजी महाराज असा संपूर्ण उल्लेख करण्यात आला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

हिंदू समाज जागृत झाला तर गाईंची कत्तल थांबेल- मोहन भागवत

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या बहिणीचं कर्करोगामुळे निधन

‘मी पुन्हा येईन’ या वाक्यात मी पणाचा दर्प नव्हता; देवेंद्र फडणवीसांचा शरद पवार यांना पलटवार

लवकर फाशी होत नसले तर पोलिसांनी केलेले एन्काउंटर योग्यच- अण्णा हजारे