रत्नागिरी : चिपळूण दौऱ्यात अधिकारी उपस्थित नसल्यानं भाजप नेत्यांनी संताप व्यक्त केला. व्यापाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन करुन त्यांची शाळाच घेतली. यावेळी बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. राणेंचा जिल्हाधिकाऱ्यांसोबत बोलतानाचा हा व्हिडीओ सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे.
“तो सीएम बीएम गेला उडत. आम्हाला कुणाचीही नावं सांगू नका. प्रांत सांगतो पालकमंत्र्यांसोबत आहे, तुम्ही सांगताय सीएमसोबत आहे. इथं कोण आहे? इथं तुमचा एक तरी अधिकारी आहे का? आतापर्यंत तुम्हाला स्वस्थ बसू दिलं, आता जागेवर बसू देणार नाही हे लक्षात ठेवा, असं नारायण राणे म्हणाले.
दरम्यान, समोर जिल्हाधिकाऱ्यांनी सीईओ संबंधित ठिकाणी असल्याचं सांगितलं. त्यानंतर कोण सीईओ आहे, मला कुणीही भेटलं नाही असं सांगितलं. मी बाजारपेठेत उभा आहे. कोण आहेत सीईओ? मला दाखवा, असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
कृष्णेची पातळी कमी होत आहे, कुणीही घाबरून जाऊ नये, लवकरच परिस्थिती पूर्वपदावर येईल- जयंत पाटील
सांगलीकराना दिलासा; कृष्णा नदीची पाणी पातळी ओसरण्यास सुरवात
मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाही म्हणणाऱ्या नारायण राणेंना आदित्य ठाकरेंचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले…
राज्याला प्रशासनही नाही, मुख्यमंत्रीही नाही, राज्य आम्हांला द्या, आम्ही वेटींगवर आहोत- नारायण राणे