मुंबई-:प्रतिनिधी
मुंबई हायकोर्टातील एका अधिकृत कार्यक्रमात भारताचे सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.
संजय राऊत यांनी पोस्ट करत “धनुष्यबाण आणि घड्याळाचा निकाल लागला, आता न्यायदेवतेनाही माफी मागावी लागेल… हे राम!” अशा शब्दांत टीका केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, न्यायालयीन कार्यक्रमावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे.

