मुंबई : लोकल रेल्वेअभावी मुंबईकरांचे हाल होत आहेत, त्यामुळे तातडीने लोकल रेल्वे सुरु करण्याची मागणी मनसेची आहे. या मागणीसाठी मनसे रस्त्यावर उतरली.
मनसेकडून सविनय कायदेभंग करत मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे, माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी लोकलमधून प्रवास केला. रेल्वे पोलिसांना गुंगारा देत संदीप देशपांडे आणि मनसे कार्यकर्त्यांनी लोकल ट्रेनने प्रवास केला.
दरम्यान, मनसेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कल्याण रेल्वे स्थानकात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कल्याणमधील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वे स्थानकात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना प्रवेशद्वारावरच रोखले. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
महत्वाच्या घडामोडी-
“मराठा आरक्षण स्थगिती विरोधात आज सोलापूर बंदची हाक;” आंदोलकांकडून रस्त्यावर टायरची जाळपोळ
भिवंडीत 3 मजली इमारत कोसळली, 8 जणांचा मृत्यू; अनेक जण इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकले
कोरोनामुक्त झालेल्यांच्या संख्येत भारत जगात अव्वल
किंग्ज इलेव्हन पंजाब विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना टाय; सुपर ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा विजय