Home महत्वाच्या बातम्या “चित्रपटगृहे, मल्टीप्लेक्स 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार”

“चित्रपटगृहे, मल्टीप्लेक्स 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार”

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 6 महिन्यांपासून बंद असलेले देशभरातील चित्रपटगृहे, मल्टीप्लेक्स येत्या 15 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहेत. अशी माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे.

प्रकाश जावडेकर यांनी त्यानुसार चित्रपटगृहासंबंधीच्या मानक कार्यप्रणाली (एसओपी) जाहीर केली. त्यादृष्टीने मंत्रालयाने ही एसओपी तयार केलं असल्याचं प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं आहे.

एसओपीनुसार चित्रपटगृहात केवळ 50 टक्के लोकांनाच प्रवेश देण्यात येईल. प्रेक्षकांना पूर्ण वेळ मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. चित्रपटगृहात पाहताना आसनव्यवस्थेत असणाऱ्या सर्व नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असणार आहे. तसेच चित्रपटगृह प्रवेशापूर्वी प्रेक्षकांना हॅंडवाश किंवा सॅनिटायझर पुरवण्यात यावे, असे निर्देशही देण्यात आले आहेत. तसेच चित्रपटगृह प्रवेश करणाऱ्या सर्वांचे आणि कर्मचाऱ्यांचेही तापमान तपासणी, कर्मचाऱ्यांची सुरक्षा इत्यादींची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

इतर महत्वाचे निर्देश

1.प्रेक्षकांना आरोग्य सेतू अॅपचा वापर करण्याचा सल्ला देण्यात यावा.

2.चित्रपटगृहात केवळ लक्षणे नसलेल्या लोकांनाच प्रवेश देण्यात यावा.

3.मल्टप्लेक्स मध्ये चित्रपट प्रदर्शन एकापाठोपाठ करता येणार नाही.

4.चित्रपटगृहातील तापमान 24 ते 30 अंश सेल्सियस दरम्यान बंधरकारक.

महत्वाच्या घडामोडी-

सुर्यकुमार यादवचे नाबाद दमदार अर्धशतक; मुंबईचे राजस्थानसमोर 194 धावांचे लक्ष्य

माझं कुटुंब, माझी जबाबदारी; तुम्ही सगळे मरा, मी राहतो घरीच; नितेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

“तिन्ही पक्षांच्या सरकारने पोलिसांच्या कामात हस्तक्षेप केला”

राफेल प्रमाणेच राहुल गांधी शेती आंदोलनाच्या विषयामध्ये सुद्धा तोंडावर आपटणार- निलेश राणे