ख्रिस जाॅर्डन-अर्शदिप सिंगची शानदार बाॅलिंग; पंजाबचा हैदराबादवर रोमांचक विजय

0
171

दुबई : आजच्या आयपीएलच्या किंग्स इलेव्हन पंजाब विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबने सनरायझर्स हैदराबादचा 12 धावांनी पराभव केला.

किंग्स इलेव्हन पंजाबने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांमध्ये 7 गडी गमावत 126 धावा केल्या. पंजाबकडून निकोलस पूरनने सर्वाधिक 28 चेंडूत नाबाद 32 धावा केल्या. तर कर्णधार के.एल.राहुलने 27 चेंडूत 27 धावा, ख्रिस गेलने 20 चेंडूत 20 धावा केल्या. तर हैदराबादकडून जेसन होल्डर, राशिद खान व संदीप शर्माने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादने 20 षटकात स्व गडी गमावत 114 धावाच करू शकली. कर्णधार डेव्हिड वाॅर्नरने 20 चेंडूत 35 धावा, जाॅनी बेअरस्टोने 20 चेंडूत 19 धावा, विजय शंकरने 27 चेंडूत 26 धावा केल्या. तर मनीष पांडेने 29 चेंडूत 15 धावा केल्या. तर किंग्स इलेव्हन पंजाबकडून ख्रिस जाॅर्डन व अर्शदिप सिंगने 3, तर मोहम्मद शमी, मुरूगन अश्विन, रवि बिश्नोई,  प्रत्येकी 1 विकेट घेतली.

महत्वाच्या घडामोडी-

कोरोनारुपी रावणाचा नाश करुया- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

देवेंद्र फडणवीस साहेब काळजी घ्या आणि कोरोनावर मात करुन लवकर बरे व्हा; रोहित पवारांचं ट्विट

माझ्या भवितव्याबाबत कोणीही चिंता करु नये; पंकजा मुंडेंचा टोला

प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर अडकली लग्नबंधनात; सोशल मिडियावर फोटो व्हयरल

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here