मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी होणार असल्याने अखेर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी अखेर राजीनामा दिला. पण आता प्रश्न उरतो की, नवा वसूली मंत्री कोण? तसेच एखादा चेहरा बदलल्याने महाविकासआघाडी सरकारचा भ्रष्ट हेतू बदलणार नाही, असं चित्रा वाघ म्हणाल्या होत्या. यावर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया देत चित्रा वाघ यांनाप्रत्युत्तर दिलं आहे.
ताईंचा नवरा स्वतः भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकलेला आरोपी असून त्यांच्यावर रीतसर गुन्हा दाखल आहे आणि ताई विचारत आहेत नवीन वसुली मंत्री कोण?? अहो ताई भावनेच्या भरात इतकंही वाहून जाऊ नका की अंगलट आलं की परत ‘पवार साहेब माझ्या वडिलांसारखेच आहेत’ हे म्हणायची वेळ येईल. थोडा धीरज रखो , सब सच सामने आयेगा.!!, अशी फेसबुक पोस्ट करत रूपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंच्या आश्वासनानंतरच राज्यात मिनी लाॅकडाऊन लागू”
“दिलीप वळसे पाटील महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री”
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा का देत नाही?; नारायण राणेंचा सवाल