आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना अनुदानासाठी सरकारवर अवलंबून का राहता? फुले आंबेडकरांनी भीक मागून शाळा सुरु केल्या होत्या, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्याचे पडसाद आता राज्यभरात उमटताना दिसत आहेत. काल त्यांच्यावर पिंपरीत शाईफेक करण्यात आली. या प्रकरणावर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
चित्रा वाघ यांनी यासंदर्भात आपला एक व्हिडीओ ट्विट करत त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना टॅग केलं आहे.
हे ही वाचा : “ठाकरेंच्या शिवसेनेत इनकमिंग सूरूच; आता ‘या’ नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”
शब्दा मागील भावना लक्षात न घेता त्यातून सोयीचे अर्थ काढायचे आणि राजकारण करायचे असे प्रकार अलिकडे सर्रास होतायत.. छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर ही सर्व थोर व्यक्तिमत्व..त्यांचा अपमान करण्याचा विचारही कुणाच्या मनाला शिवू शकत नाही…, असं चित्रा वाघ म्हणाल्या.
आमचे नेते @ChDadaPatil दादा यांनी तो शब्द अनावधानाने वापरला
चूक लक्षात आल्यावर दिलगिरीही व्यक्त केली तरीही त्यांच्यावर शाई फेक करण्यात आली
ही निव्वळ झुंडशाही आहे झाल्या प्रकाराचा मी तीव्र शब्दात धिक्कार करते
हे खपवून घेतले जाणार नाही @Dev_Fadnavis @cbawankule @BJP4Maharashtra— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) December 10, 2022
आमचे नेते चंद्रकांत पाटील दादा यांनी तो शब्द अनावधानाने वापरला चूक लक्षात आल्यावर दिलगिरीही व्यक्त केली तरीही त्यांच्यावर शाई फेक करण्यात आली ही निव्वळ झुंडशाही आहे झाल्या प्रकाराचा मी तीव्र शब्दात धिक्कार करते हे खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही चित्रा वाघ यांनी यावेळी दिला.
महत्त्वाच्या घडामोडी –
…तर शिवाजी महाराजांनी, अब्दुल सत्तारांचा कडेलोट केला असता; अमोल मिटकरींचा हल्लाबोल
मला पक्षातून बाहेर ढकलण्याचं काम केलं जातंय; डॅशिंग नेते वसंत मोरेंचा खळबळजनक आरोप
मोठी बातमी: चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरीत शाईफेक