आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्यात आरोग्य विभागांच्या परीक्षांच्या गोंधळाचे सत्र अजूनही सुरूच आहे. आरोग्य विभागाच्यावतीने ‘गट ड’ संवर्गातील विविध पदांसाठी 31 ऑक्टोबर रोजी परीक्षा पार पडली. ‘गट ड’च्या परीक्षेचा पेपर फुटल्याचा प्रकार उघडकीस आला. तरीही, या परीक्षेत राज्यातील अनेक शहरांत सावळा गोंधळ उडाला. यावरून भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र लिहीत ठाकरे सरकारवर निशाणा साधालाय.
हे ही वाचा : तुम्ही मर्द आहात ना? मग डायरेक्ट देवेंद्रजींना टार्गेट करा; अमृता फडणवीसांचं प्रत्युत्तर
पाचव्यांदा आरोग्य विभागाच्या परीक्षेत गोंधळ झाला आहे. पेपरफुटीने राज्याचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. असं म्हणत आदित्य ठाकरेजी, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर तरी डरकाळी फोडावी, असा टोला चित्रा वाघ यांनी ठाकरेंना लगावला आहे. खरंतर तुम्हाला पत्र लिहून व्यथा मांडण्याची गरज नव्हती पण तुमच्या वडिलांनीच ही वेळ आणली आहे. त्यांना तुमच्याशिवाय कुणाचीच चिंता नाही. तुमच्याशिवाय कुणाचे ऐकत नाही, म्हणून तुमच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना ही विनंती करत आहे, असं चित्रा वाघ यांनी पत्रात म्हटलं आहे.
दरम्यान, चित्रा वाघ यांनी या पत्रात आदित्य ठाकरे यांना चार प्रश्न विचारले आहेत.
श्री. आदित्य ठाकरे जी यांना पत्र.
पाचव्यांदा आरोग्य विभागाच्या परिक्षेत गोंधळ झाला आहे…
पेपरफुटीनं राज्याचा कारभार चव्हाट्यावर आला आहे…@AUThackeray जी,
विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर तरी डरकाळी फोडावी… pic.twitter.com/2yHC3Tb38q— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) November 1, 2021
महत्वाच्या घडामोडी –
उद्धव ठाकरे, शरद पवार आणि अजित पवार येणार एकाच मंचावर; चर्चांना उधान
नवाब मलिकांचे देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप; पंकजा मुंडे म्हणल्या…
“..म्हणून मी ईडीच्या चौकशीला सामोरे जातोय”