मुंबई : करोनाला रोखण्यासाठी राज्यासह देशभरात लॉकडाऊन जारी केला गेला, तरीही नागरिकांकडून त्याचे अद्याप गांभिर्याने पालन करण्यात येत नसल्याचे दिसत आहे. यावर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी मत व्यक्त केलं आहे.
इतक्यांदा सांगून ही काही अतिउत्साही घरात करमत नाही म्हणून बाहेर पडतात
त्यांना मारु नका पण तात्काळ 1 बॅग रक्त संकलित करा म्हणजे रक्ताचा तुटवडा कमी होईल. त्यांच्याकडून 500 दंड वसूल करुन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करा, जो कोरोनाग्रस्त उपचारासाठी कामात येईल, अशी विंनती चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
दरम्यान, अशा लोकांना त्यांची इच्छा असल्यास हॉस्पिटल मध्ये सेवक म्हणून भरती करून घ्या. म्हणजे हॉस्पिटलची गरज भागेल यावर विचार व्हावा, असंही चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे
३)आणि त्याची इच्छा असल्यास
हॉस्पिटल मध्ये सेवक म्हणून भरती करून घ्या…. हॉस्पिटलची गरज भागेल यावर विचार व्हावा @AjitPawarSpeaks @rajeshtope11 @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil @PTI_News @PravinAlai @ShelarAshish @SMungantiwar @PrasadLadInd— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) March 25, 2020