रत्नागिरी : राज्यात जोरदार मुसळधार पाऊस कोसळत आहे. चिपळूणमध्ये आभाळ ढगफुटीचा प्रत्यय आला आहे. अतिवृष्टीनं भीषण स्थिती निर्माण झाली आहे. तसेच हजारो लोकं घरात अडकले आहेत.
रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाचा चिपळूण शहराला ‘फटका बसला आहे. शहरातील अनेक भागात पाणी भरले असून बाजार पेठ ,मच्छी मार्केट ,भाजी मार्केट या सर्वच ठिकाणी पुराचं पाणी शिरलं आहे. तसंच चिपळूण येथे वशिष्ठी नदीला पूर आल्यामुळे चिपळूण येथील बाजारपूल पाण्याखाली गेला आहे. तर चिपळूण खेर्डी परिसराला देखील या पुराचा फटका बसला आहे.
चिपळूणमध्ये 5000 लोक अडकल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली. अडकलेल्या लोकांना तात्काळ बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मदतकार्यात कोस्टगार्डचे हेलिकॉप्टर पाठवणार असल्याची माहिती विनायक राऊत यांनी यावेळी दिली.
दरम्यान, लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. परशुराम घाटात दरड कोसळून तिघांचा मृत्यू झाला आहे. 2 एनडीआरएफच्या टीम चिपळूणला रवाना झाल्या असून लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
“देवेंद्र फडणवीस खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे कैवारी आहेत”
“जातीचा उल्लेख केल्याप्रकरणी भारताचा टी-20 स्पेशालिस्ट सुरेश रैना वादाच्या भोवऱ्यात”
“दिलेला शब्द जागणारे व कामातही ‘दादा’ असणारे अजित दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”
सगळे प्रश्न कोमात, तिन्ही पक्षात स्वबळाची छमछम जोमात; आशिष शेलारांचा घणाघात