मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही सुशांतच्या कुटुंबिय, चाहत्यांच्या भावना समजू शकतो. पण मी या सर्वांना एक विनंती करतो की आपण या विषयावर होत असलेल्या राजकरणाचा भाग बनू नका, असं उद्धव ठाकरे म्हणाले
“मुंबई पोलीस हे कार्यक्षम आहेत. जर कोणाकडेही कोणते पुरावे असतील तर त्यांनी ते आमच्याकडे सोपवावे. आम्ही दोषींची चौकशी करून त्यांना शिक्षा करू. परंतु कृपया करून या प्रकरणाचा वापर महाराष्ट्र आणि बिहार या राज्यांदरम्यान वाद उत्पन्न करण्यासासाठी करू नका,” असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
दरम्यान, यापूर्वी बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी मुंबई पोलिसांवर आरोप केले होते. “सुशांतच्या मृत्यू प्रकरणाची बिहार पोलिसांकडून चौकशी केली जात असून, मुंबई पोलिसांकडून निष्पक्ष चौकशीत अडथळा आणला जात आहे. त्यामुळे सीबीआयनं हे प्रकरण स्वतःकडे घ्यावं, असं भाजपाला वाटतं,” असं सुशील कुमार मोदी यांनी म्हटलं होतं.
महत्वाच्या घडामोडी-
भाजपचे 40 आमदार आमच्या संपर्कात- बच्चू कडू
भाजप भविष्यात शिवसेनेसोबत युती करणार का? नितीन गडकरी म्हणाले…
देवेंद्र फडणवीस यांना कदाचित WHO मधून मार्गदर्शनासाठी बोलवतील; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
देवेंद्र फडणवीस लग्नासाठी उतावीळ, पण त्यांना नवरीच मिळेना-प्रकाश आंबेडकर