आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
औरंगाबाद : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. हा सोहळा पार पडल्यानंतर औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं. या कार्यक्रमात भाजप नेते व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री सुभाष देसाई, अब्दुल सत्तार, MIM खासदार इम्तियाज जलील हे उपस्थित होते. तसेच मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात भाजपला पहिल्यांदाच खुली ऑफर दिल्याचं पहायला मिळालं.
जर तुम्ही मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसाठी पुढाकार घेत असाल तर मी तुमच्या पाठीशी खंभीरपणे उभा राहील, हा शब्द मी देतो, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी रावसाहेब दानवे यांना दिलं.
मराठवाड्यात आपण आपापसात भांडत कशाला बसायचं? नालायकपणे कारभार करुन आपणही भांडत राहिलो तर फरक काय राहिला. अपेक्षेशिवाय आयुष्य असू शकत नाही, तुम्ही आमच्याकडे आणि आम्ही तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करायच्या. एकत्र आलो तर भावी सहकारी होऊ, असं विधान मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील चर्चांना उधाण आलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांना मोठा धक्का; पक्षाचा आदेश न मानणाऱ्यांचे पद रद्द
भाजपच्या माजी नगरसेवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल; किरीट सोमय्याची प्रतिक्रिया, म्हणाले…
चंद्रकांत पाटील म्हणाले माजी मंत्री म्हणू नका; संजय राऊत म्हणतात…
शिवसेनेला वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सरकारमधून बाहेर पडावं- रामदास आठवले